टेक मराठी नेमकी काय संकल्पना आहे ?
नमस्कार मित्रांनो TEK-MARATHI (टेक मराठी) हि एक टेक्नॉलॉजी विषया-संदर्भातील मराठी ब्लॉगिंग वेबसाइट आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी टेक्नॉलॉजी संदर्भातील सर्व माहिती साध्या व सोप्या भाषेतून उपलब्ध करून देणे या वेबसाइटचे उद्धिष्ट आहे. विविध प्रकारचे मार्केट मध्ये लाँन्च होणारे नवनवीन इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणजे स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉचेस, ब्लूटूथ इअर बड्स, टेलीव्हिजन आणी दैनंदिन वापरात येणाऱ्या गॅजेटची सखोल माहिती आपल्याला टेक मराठी या वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे.
तसेच डेली टेक-न्युज या विभागातुन जगभरातील टेक्नॉलॉजी क्षेत्रातील घडामोडीचा आढावा आपण घेणार आहोत. भविष्यात आर्टिफिशील इंटेलिजन्स आणी मशीन लर्निंग या टेक्नॉलॉजीच्या साह्याने होणाऱ्या नवनवीन तांत्रिक शोधाबाबत सविस्तर माहिती आपण नियमित ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रामधील लाँन्च होणाऱ्या नविन इलेक्ट्रिक कार, बायो-फ्युएल कार आणी सेल्फ-ड्रायविंग कार यासारख्या तंत्रज्ञानाची सखोल माहिती आपण टेक मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत.
सर्व तांत्रिक विषयाची सत्य सखोल माहिती व्यवस्तीथ रिसर्च करूनच आपल्या पर्यन्त पोहचवली जाणार आहे. त्यामुळे तांत्रिक विषयातील आपल्या ज्ञानात वृद्धी करून, नवनवीन गॅजेट खरेदी करण्यापूर्वी त्याची सखोल माहिती मिळवण्यासाठी आजच टेक मराठीच्या सर्व सोशल मिडियाला फॉलो करा.