Realme P1 5g स्मार्टफोन प्रिमिअम फिनिक्स रेड डिझाईन मध्ये झाला लॉन्च Budget ₹15,000?

By Tek Marathi

Updated on:

Realme India ने आज भारतात Realme P1 5g हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme नेहमीच बजेट श्रेणीतील स्मार्टफोन उत्कृष्ट रित्या बनवते. हा स्मार्टफोन सुद्धा त्यांनी 15,999/- बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी लक्षवेधी फीचर सहीत लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आपल्याला 22 एप्रिल पासुन 12PM नंतर फ्लिपकार्ट च्या वेबसाइट वर उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन आपल्याला फिनिक्स रेड आणी पीकोक ग्रीन या दोन रंगसंगती मध्ये मिळणार आहे.

Realme P1 5g याचे बजेट मॉडेल आपल्याला 15,999/- मध्ये 128gb स्टोरेज 6gb रॅम सहीत मिळणार आहे. तर 256gb स्टोरेज 8gb रॅम चे मॉडेल आपल्याला 18,999/- मध्ये मिळणार आहे. तसेच कुपण डिस्काउंटचा वापर केल्यास 1000/- रुपयाची मुळ किंमतीमध्ये सुट मिळणार आहे. हा स्मार्टफोन 188 ग्रॅम हलक्या वजनाचा असून Dimensity 7050 प्रोसेसर, 120hz अमोलेड डिस्प्ले, 5000mah ची बॅटरी, 45 वॉट फास्ट-चार्जेर आणी 50 मेगापिक्सलचा AI कॅमेरा यासोबत येतो. चला तर मग आपण या स्मार्टफोनची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डिस्प्ले

Realme P1 हा स्मार्टफोन आपल्याला 6.67″ फुल HD अमोलेड डिस्प्ले सहित मिळतो. त्यात आपल्याला 120Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. हा रिफ्रेश रेट आपल्याला गेमिंग तसेच फास्ट रिफ्रेश रेट असणारे मल्टिमीडिया पाहण्यासाठी महत्वाचा आहे. यात 5,000,000 : 1 रॅपिड कॉन्ट्रास्ट रेशो आहे. हा डिस्प्ले सॅमसंगने बनवला आहे. डिस्प्लेचे रिझोल्युशन 2400 x 1080 असून पीक ब्राईटनेस 2000 नीटसचा आहे. आणी टच संपेलिंग रेट 2200hz चा आहे. तसेच स्क्रिन टु बॉडी रेशो 92.65% आहे.

realme p1 realme p1 5g Realme P1 Price realme phone Dimensity 7050

त्यामुळे डिस्प्लेला येणाऱ्या कडा फार कमी असून यात व्हिडिओज पाहण्याची अनुभूती मजेशीर असणार आहे. याची साईझ 162.95mm x 75.45mm x 7.97mm आहे. तर वजन १८८ ग्रॅम आहे. याच्या बॉक्ससोबत चार्जर, यूसबी केबल, स्क्रीन गार्ड, मोबाईल कव्हर केस, सिमकार्ड इजेक्टर पिन आणी माहिती पुस्तिका भेटते. Realme P1 5G फोनमध्ये फ्लॅट स्क्रीन आहे. हा मोबाइल 2412 X 1080 पिक्सेल रिझोल्यूशन असलेल्या 6.67 इंच फुलएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च करण्यात आला आहे जो AMOLED पॅनेलवर बनवला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 600nits ब्राइटनेससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

प्रोसेसर – Dimensity 7050

Realme P1 या स्मार्टफोनमध्ये आपल्याला मिडियाटेक या कंपनीचा Dimensity 7050 हा प्रोसेसर मिळतो. हा एक 9 (5g) बँड असणार प्रोसेसर आहे. हा 2.6 Ghz फ्रिक्वेन्सीवर कार्यरत असून ऑक्टाकोअर टेक्नॉलॉजी सहित उपलब्ध आहे. या प्रोसेसरच्या वापरामुळे स्मार्टफोनमध्ये होणारी दैनदिन जीवनातील कामे सोयीस्कर होणार आहेत. तसेच 6gb आणी 8gb या विकल्पासहित मिळणारी रॅम ह्या स्मार्टफोनचा वेग द्विगुणित करणार आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Mali-G68 GPU आहे. realme P1 5G फोन रॅम UFS3.1 + LPDDR4X स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करते. हा मोबाइल 8 GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो जो फोनच्या फिजिकल रॅमसह 16 GB पर्यंत वाढवतो. या फोनमध्ये 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे जे microSD कार्डद्वारे 1 TB पर्यंत वाढवता येते.

realme p1 realme p1 5g Realme P1 Price realme phone Dimensity 7050

स्मार्टफोन मध्ये हिटिंग इश्यू होऊ नये यासाठी खास 4356.62 mm चे वेपर कुलिंग चेंबर दिले आहे. ते सुद्धा सुधारित 7 स्तरमध्ये डिझाईन करण्यात आले आहे. जेणेकरून गेमिंग करताना स्मार्टफोन ओव्हर-हिट होऊ नये. यात G-68 MC 4 ग्राफिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. स्मार्टफोन लेटेस्ट Android 14 च्या सपोर्ट सहित येतो. त्यात Realme ने स्वतः चा Realme UI 5.0 युजर इंटरफेस दिला आहे. Realme P1 5G स्मार्टफोन Android 14 वर लॉन्च करण्यात आला आहे जो Realme UI 5.0 सह एकत्र काम करतो. कंपनीने हा फोन 4थ जनरेशन अँड्रॉइड सॉफ्टवेअर अपडेट आणि 3 वर्षांच्या सिक्युरिटी अपडेटसह येणार आहे.

कॅमेरा – 50MP

Realme P1 स्मार्टफोन 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सहित येतो त्यात सॅमसंगचा S5KJN1 सेन्सर वापरण्यात आला आहे. त्याचे ॲपेरचर F/1.8, सेन्सर साइज 1/2.76 आणी पिक्सल साइज 0.64um आहे. त्यात PDFA तसेच 5-P लेन्स या सुधारित टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात 2 मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा ॲपेरचर F/2.4, सेन्सर साइज 1/5 आणी पिक्सल साइज 1.75um देण्यात आला आहे. यात 3-P लेन्स टेक्नॉलॉजी वापरली आहे.

realme p1 realme p1 5g Realme P1 Price realme phone Dimensity 7050

व्हिडिओसाठी मूव्ही मोड, मल्टी व्हिडिओ मोड, Time-lapse, स्लो मोशन असे फिचर दिले आहेत. यात ऑप्टिकल झूमचा पर्याय उपलब्ध नाही. तसेच 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात Hynix Hi-1634q चा सेन्सर आहे. याचे ॲपेरचर F/2.45, सेन्सर साइज 1/3 आणी पिक्सल साइज 1.0um देण्यात आली आहे. प्रायमरी कॅमेरा सोबत फ्लॅश लाईट दिलेला आहे. व्हिडिओज शूट करताना मागील कॅमेराने 4K @30 Fps आणी 1080p @120Fps आणी पुढील कॅमेराने 1080p, 720p @30 Fps असे पर्याय उपलब्ध आहेत.

बॅटरी – 5000mah

Realme P1 हा 5000mah च्या बॅटरी सहित येतो. त्यामुळे बॅटरीचा परफॉर्मन्स दमदार असणार आहे. तसेच याला चार्ज करण्यासाठी लागणार चार्जर हा बॉक्स मध्ये मिळतो त्याची 45 वॉट सुपरवुकची क्षमता आहे. हा स्मार्टफोन 0 ते 50% फक्त 27 मिनिटामध्ये चार्ज करू शकतो. तसेच 0 ते 21% फक्त 10 मिनिटामध्ये चार्ज करू शकतो. संपूर्ण चार्ज मध्ये हा स्मार्टफोन 85 तासाचे म्युझिक, 31 तासाचे कॉलिंग आणी 17 तासाचा YouTube प्लेबॅक करू शकतो असे कंपनीचे म्हणने आहे. दिवसभरातील सर्व कामे तुम्ही एका चार्ज मध्ये करू शकता. यात रेनवॉटर स्मार्ट-टच हे फिचर दिले आहे यामुळे पावसाळ्यात तुम्हाला डिस्प्ले टच करताना अडथळे येणार नाहीत. तुम्ही तुमचे कामे सुरळीत करू शकता.

realme p1 realme p1 5g Realme P1 Price realme phone Dimensity 7050

तसेच इन डिस्प्ले 3D फिंगर प्रिंट स्कॅनर दिला आहे. तो सुरक्षित बँकिंग पेमेंटसाठी उपयुक्त आहे. यामध्ये WiFi 6, 5G, 4G Volte, यूएसबी टाईप C, ब्लूटूथ 5.2 , 3.5 Audio जॅक हे पर्याय दिले गेले आहेत. सेन्सरच्या बाबतीत सुद्धा सर्व महत्वाचे सेन्सर दिले गेले आहेत यात मग्नेटिक, जायरोमिटर, प्रॉक्सीमिटी, अंबिएंट लाईट, GPS, ॲक्सेलरेशन सेन्सर मिळत आहेत. हा स्मार्टफोन Dual Stereo स्पीकर सहित येतो. तसेच यात अंटेना अँरे मॅट्रिक्स सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे E-Game नेटवर्क, वायरलेस ब्रस्ट, दॅट-स्मार्ट अंटेना टेक्नॉलॉजी फीचर मुळे गेमिंगचा दर्जा वाढतो.

» हे सुध्दा वाचा :- Galaxy S24 Ultra : Galaxy AI चे नवीन वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन Flipkart big billion days सेलमध्ये कितीला मिळणार?

Realme P1 Price

Realme ने 320+ क्वालिटी टेस्ट या स्मार्टफोनचे केले आहेत. त्यामध्ये 5,00,000 वेळेस पॉवर बटन On-Off टेस्ट, 1,00,000 वेळेस Volume बटन टेस्ट, 20,000 वेळेस USB पोर्ट टेस्ट, 28,000 वेळेस मायक्रो-ड्रॉप टेस्ट आणी 300 तास -40° ते 70°C शॉक Temperature टेस्ट केलेली आहे. यामुळे बिल्ड क्वालिटी मध्ये सुधारणा झाली आहे. यामध्ये IP54 चे वॉटर आणी डस्ट प्रोटेक्शन दिलेले आहे. हा स्मार्टफोन खालील किंमती मध्ये फ्लिपकार्ट या ऑनलाइन स्टोअरला 22 एप्रिल पासून 12PM नंतर उपलब्ध होणार आहे. Realme P1 5G चे दोन मॉडेल खाली दिलेल्या किंमतीप्रमाणे लाँच होणार आहेत.

Realme P1 5G फोन दोन मेमरी व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलमध्ये 128 जीबी स्टोरेजसह 6 जीबी रॅम आहे, ज्याचा दर 15,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे, मोठा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि त्याची किंमत 18,999 रुपये आहे. कंपनी Realme P1 5G 6 GB वर 1 हजार आणि 8 GB मॉडेलवर 2 हजारांची सूट देत आहे, त्यानंतर ते 14,999 आणि 16,999 रुपयांना खरेदी करता येतील. या Realme मोबाइलची विक्री फ्लिपकार्टवर होईल.

//www.youtube.com/embed/D4ho2j6lQ_w

° Realme P1 5G – 128Gb/6Gb = 15,999/-

° Realme P1 5G – 256Gb/8Gb = 18,999/

Realme P1 5G या स्मार्टफोनची सखोल माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Realme इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. आणी अशाच TECH संदर्भातील सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गॅजेट-गप्पा (Gadget-Gappa) च्या सर्व सोशल मिडियाला फॉलो करा.

अधिकृत वेबसाइट – www.realme.com

 

Leave a Comment

Temp 2 TEMP 1