Tech-News 3 : Flipkart Big Saving days 4 मे पासून होणार सुरु, Meta AI : आता WhatsApp वर..

By Tek Marathi

Updated on:

नमस्कार वाचकांनो Gadget-Gappa च्या TECH News 3 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या टेकन्यूज मध्ये Realme C65, Flipkart Big Saving days, Meta AI, OpenAI आणी TATA Electronics याबाबत माहिती घेणार आहोत.

Realme C65

Realme C65 स्मार्टफोन हा 26 एप्रिलला 10,499/- किंमतीमध्ये लाँन्च झाला आहे. बजेट श्रेणीतील ग्राहकांसाठी कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त फिचर देण्याचा प्रयन्त रिअलमीकडून करण्यात आला आहे. यात MediaTek Dimensity 6300 5G Chipset देण्यात आली आहे. जी ऑक्टकोर 6 नॅनोमीटर असून 2.2Ghz वर कार्यरत आहे. रिअलमी C65 मध्ये ARM G57 MC2 हा ग्राफिक प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन 4Gb / 6Gb या रॅम ऑपशनमध्ये 128 Gb स्टोरेज कॅपॅसिटी मध्ये मिळतो.

Realme C65 2024

रिअलमी C65 यामध्ये डिस्प्ले आपल्याला कमालीचा भेटतो ज्यात 120hz चा रिफ्रेश रेट असून 500 नीटस पर्यंत पीक ब्राईटनेस आहे. 1604 x 720 असे डिस्प्लेचे रिसोल्युशन असून 16.7 मिलियन कलरला सपोर्ट करते. 5000mah ची बॅटरी असून सोबत 15 वॅट फास्ट चार्जिंग दिलेली आहे. रिअलमी C65 मध्ये कॅमेरा सुद्धा 50 मेगापिक्सेल असून खास AI च्या वैशिष्टय सहित दिला आहे. 10,499/- या किंमतीमध्ये रिअलमीने ग्राहकांना उपयुक्त असणारे फिचर देऊन खुश करण्याचा प्रयन्त केला आहे.

Realme C65 स्मार्टफोनचा 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 10,490 रुपयांना खरेदी करता येईल. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,490 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12,490 रुपयांना उपलब्ध करण्यात आले आहे. रिअलमी C65 बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिअलमी इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अधिकृत वेबसाईट – Realme

Flipkart Big Saving days

Flipkart नेहमीच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Flipkart Big Saving days या नावाने भरगोस सूट असणारी डीलस घेऊन येते. या ऑफरमध्ये जे प्रॉडक्ट ग्राहक जास्त खरेदी करतात त्या प्रॉडक्ट्सवर खूप मोठे डिस्काउंट पाहायला मिळतात. परंतु गेल्या दोन महिन्यापासून आपल्याला हि ऑफर पाहायला भेटली नाही. एप्रिल महिन्यामध्ये Mega Saving days नावाने काही ऑफर पाहायला भेटल्या होत्या. परंतु जी मजा ग्राहकांना Flipkart Big Saving days या दरम्यान ऑफरवर खरेदी करायला मिळते. तसे मोठे डिस्काउंट Mega Saving days या ऑफर मध्ये काही दिसले नाहीत.

Flipkart Big Saving days 2024

Flipkart Big Saving days 4 मे पासून सुरु होत असून 8 मे पर्यंत असणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टचे प्लस मेंबर असाल तर तुम्हाला 2 मे पासूनच या सेलच्या ऑफर मिळायला सुरवात होईल. यामध्ये तुम्हाला मोबाईल, फॅशन, ब्युटी प्रॉडक्ट्स, टेलीव्हिजन, स्मार्ट-गॅजेट्स, गरजेच्या घरगुती वस्तू आणी इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये भरगोस सूट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घेऊन नक्की तुमच्या शॉपिंग मध्ये मोठे डिस्काउंट मिळवू शकता.

Meta AI : आता WhatsApp वर सुद्धा..

गेल्या वर्षी लाँन्च झालेला Meta AI हा आता चार प्लॅटफॉर्म मध्ये उपलब्ध आहे. त्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअँप आणी मेसेंजर हे समाविष्ट आहेत. मेटा एआय हा Chat-GPT ला टक्कर देण्यात यशस्वी होईल का? हे आता WhatsApp चे वापरकर्ते ठरवतील. कारण चारही प्लॅटफॉर्म मध्ये व्हाट्सअँप च्या युजर्सची संख्या जास्त आहे. जर तुम्हाला मेटा एआयचे फिचर मिळाले नसेल तर प्रथम तुम्ही तुमचे WhatsApp प्लेस्टोर किंवा अँपस्टोरला जाऊन अपडेट करून घ्या. मेटाचे असे म्हणणे आहे की ते त्याच्या ॲप्स आणि उपकरणांसह Meta AI ची पोहोच वाढवत आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील याची खात्री करण्यासाठी, एआय चॅटबॉटमध्ये नवीन वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. हे व्हॉट्सॲपवर वापरले जाऊ शकते, जे तुम्ही ॲप उघडताच दिसेल.

त्यानंतर तुम्हाला गोलाकार आकाराची एक रिंग पाहायला मिळेल ती गुलाबी आणी जांभळ्या रंगांच्या छटेमध्ये आहे. यात तुम्हाला (Ask Meta AI Everything) या पर्याया-अंतर्गत Chat-GPT सारखे सर्व फिचर वापरायला मिळतील. तुम्ही मेटा एआय सोबत गप्पा मारू शकता. विविध प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. त्यामुळे WhatsApp वर येणाऱ्या मेटा एआयचा तुम्ही नक्की एकदा वापर करून बघा.. तुम्ही Google Search प्रमाणे Meta AI वापरू शकता. जसे तुम्ही Google ला प्रश्न विचारता तसे तुम्ही Meta AI ला देखील प्रश्न विचारू शकता. चांगली गोष्ट म्हणजे ही सेवा आता मराठीतही उपलब्ध आहे. मेटाचा एआय चॅटबॉट त्याच्या डेटावर आधारित काही सेकंदात उत्तरे देतो. याशिवाय, तुम्ही Meta AI चा वापर इंग्रजी शिकण्यासाठी, मेलचा मसुदा तयार करण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी आणि प्रतिमा तयार करण्यासाठी करू शकता.

Meta AI 2024

तुम्हाला तुमच्या क्षेत्राचे हवामान जाणून घ्यायचे असल्यास, तुम्ही इनबिल्ट मेटा एआयशी WhatsApp वर चॅट करू शकता-
स्टेप 1: तुम्हाला ज्या ग्रुप चॅटमध्ये AI वापरायचे आहे ते उघडा.
स्टेप 2: मेसेजमध्ये @ टाइप करा, त्यानंतर Meta AI वर क्लिक करा
स्टेप 3: आता अटी व शर्ती वाचा आणि स्वीकारा
स्टेप 4: आता तुम्हाला तुमचा प्रश्न किंवा प्रॉम्प्ट टाईप करावा लागेल आणि तो एंटर करावा लागेल.
स्टेप 5: आता मेटा एआय तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसह तयार असेल.

Apple iPhone मध्ये OpenAI

Open AI ची सुरुवात 11 डिसेंबर 2015 रोजी ना-नफा संशोधन कंपनी म्हणून झाली. ज्याचा उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या फायद्यासाठी वापरणे हा होता. जगातील अनेक दिग्गजांनी मिळून त्याची सुरुवात केली होती. टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, इल्या सुत्स्केव्हर, ग्रेग ब्रॉकमन, सॅम ऑल्टमन यांनी मिळून सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे ओपन एआयची पायाभरणी केली. या कंपनीचा उद्देश एआयचा अभ्यास करणे. शिवाय, मानवांना मदत करण्यात मोठी भूमिका बजावाणे. 2015 मध्ये जेव्हा त्याचा पाया घातला गेला तेव्हा सर्व संस्थापकांनी मिळून 1 अब्ज डॉलर्सने हा प्रकल्प सुरू केला.

कंपनीने अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म सुरू केले. जसे- संशोधनासाठी AI जिम उघडली. चाचणी आणि विकासासाठी युनिव्हर्स प्लॅटफॉर्म लाँच केले. अशाप्रकारे, जगभरातील वेबसाइट्स, गेम आणि इतर प्रयोगांमध्ये त्याचा वापर प्रचार केला गेला. मानवाच्या गरजेनुसार प्रणाली तयार करण्यासाठी, चॅटबॉट्स आणि व्हर्च्युअल असिस्टंट सारख्या प्रणालींचा वापर वेगाने वाढू लागला. यामध्ये एआयच्या वापरामुळे मानवाच्या गरजा पूर्ण करण्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले. अशी प्रणाली तयार करून ओपन एआयने एआयच्या जगात आपले नाव कोरले.

Apple iPhone 2024

Apple iphone च्या आगामी iPhone मध्ये OpenAI ची जनरेटिव्ह ए-आय टेक्नॉलॉजी असू शकते. अँपल आणी ओपन-AI या दोन्ही कंपनी एकमेकांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. त्यामध्ये त्याचे मुख्य उद्धिष्ट म्हणजे अँपलकडून भविष्यात लाँन्च होणारी IOS 18, हि ऑपरेटिंग सिस्टिम यात OpenAI कडून त्याचे Generative AI चे नवीन फिचर्स इंटिग्रेट करायचे असा आहे. Chat GPT – 4 हे OpenAI चे लेटेस्ट प्रॉडक्ट असून त्याला लोकांचा प्रतिसाद फार चांगला आहे.

OpenAI ने प्रगतिशील तर्क-वितर्क, क्रीयेटीव्हिटी, व्हिज्युअल इनपुट, दीर्घ संदर्भ असे नाविन्यपूर्ण बदल केल्यामुळे 180.5 मिलियन वापरकर्ते त्यांना प्राप्त झाले आहेत. तर फक्त जानेवारी 2024 या एका महिन्यामध्ये 1.6 बिलियन वापरकर्त्यांची त्यांच्या वेबसाइटला भेट दिलेली होती. त्यामुळे अँपल सोबत भागीदारी करून IOS 18 मध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

TATA Electronics करणार आयफोन केसिंग

iphone case tata electronics 2024

TATA Electronics यांनी दोन मोठ्या उद्योगसमूहांशी हातमिळवणी केली आहे. पुणे आणी बैंगलोर दोन्ही ठिकाणी या कंपनीची कॉप्लेक्स हाय प्रेसिजन मशीन तयार करण्याची यंत्रसामग्री आहे. यामध्ये प्रामुख्याने आयफोनची केस तयार करणे हे काम आहे. आयफोन ची केस हि मेटल आणी ग्लास याच्या कॉम्बिनेशन मध्ये बनवली जाते. त्यामुळे ती दिसायला आकर्षक आणी मजबूत असते. अशाप्रकारची केस तयार करण्यासही खास कॉप्लेक्स हाय प्रेसिजन मशीनची गरज भासते. हि गरज पूर्ण करण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांनी पुणे आणी बैंगलोर मधील उद्योगसमूहांशी पार्टनरशिप करत कामाचा वेग आणी दर्जा वाढविण्याच्या प्रयन्त केला आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना टाटा इलेक्ट्रॉनिक्स मुळे आयफोनच्या प्रोडकशनमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल.

कुठल्याही नविन टेक्नॉलॉजी विषया-संदर्भातील माहिती हवी असल्यास तो विषय कॉमेंट्सच्या माध्यमातून किंवा आमच्या इतर सोशल-मिडियाच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद..

Leave a Comment

Temp 2 TEMP 1