Tech-News 4 : WhatsApp भारतात ban होणार का ? आणी Jio-Cinema Premium झाले स्वस्त

By Tek Marathi

Updated on:

नमस्कार वाचकांनो Gadget-Gappa च्या TECH News 4 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या टेक-न्यूज मध्ये WhatsApp, Samsung Galaxy unpacked इव्हेंट, HMD स्मार्टफोन, Oneplus 13 आणी JioCinema Premium याबाबत माहिती घेणार आहोत.

WhatsApp ban भारतामध्ये बंद होणार का?

WhatsApp ban होणार का? WhatsApp चा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता दुसरा मेसेजिंग अँपचा पर्याय शोधावा लागू शकतो. कारण WhatsApp आता बंद होण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्ट मध्ये एका केसच्या प्रकरणात WhatsApp मध्ये झालेल्या मेसेजेसचा डेटा मागण्यात आला आहे. त्यासाठी WhatsApp जे मेसेजेसच्या सिक्यूरीटीसाठी एंड टू एंड एनकॅरॅपशन फिचर लावते. ते काढण्याची मागणी दिल्ली हायकोर्टकडून करण्यात आली आहे. WhatsApp हे त्याचे एंड टू एंड एनकॅरॅपशन फिचर काढणार नाही. कारण ग्राहकांच्या सिक्यूरीटीसाठी हे फिचर महत्वाचे आहे. आणी जर दिल्ली हायकोर्टकडून याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्यात आली तर आम्ही WhatsApp संपूर्ण भारतामध्ये बंद करू असे WhatsApp india ने सांगितले आहे.

त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टकडून कोणती भुमिका घेतली जाते यावर WhatsApp चे भारतामधील भवितव्य ठरणार आहे.व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेला सर्वोतोपरी ठेवते. हे लक्षात घेऊन कंपनीने भारतातील सुमारे 80 लाख खाती बंद केली आहेत. ही बंदी 1 मार्च ते 31 मार्च या कालावधीतील डेटा आणि तपशीलांवर आधारित आहे. युजर्सनी 12782 अकाऊंटबद्दल तक्रारही केली होती, त्यापैकी 6661 अकाऊंट्स बॅन करण्यात आली आहेत. व्हॉट्सॲपचे भारतात तसेच जगभरात लाखो वापरकर्ते आहेत. Meta च्या मेसेजिंग ॲपचा उद्देश लोकांसाठी एक सुरक्षित प्लॅटफॉर्म तयार करणे आहे. हा ट्रेंड सुरू ठेवत व्हॉट्सॲपने 80 लाख खात्यांवर बंदी घातली आहे.

हा अहवाल माहिती तंत्रज्ञान नियम 2021 अंतर्गत प्रकाशित करण्यात आला आहे. व्हॉट्सॲपने 1 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान भारतात 7.9 दशलक्षाहून अधिक खात्यांवर बंदी घातल्याचे म्हटले आहे. आपला मासिक अहवाल जारी करताना, प्लॅटफॉर्मने सांगितले की वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वी, यापैकी 1,43,0000 खात्यांवर सक्रियपणे बंदी घालण्यात आली होती.


Samsung galaxy unpacked 2024 इव्हेंट होणार पॅरिस मध्ये

Samsung galaxy unpacked 2024 या इव्हेंटची तारीख आता जाहीर झाली असून 6 जुलैला हा इव्हेंट पॅरिस येथे होणार आहे. या इव्हेंटचे खास आकर्षण असणार ते म्हणजे Galaxy Ring. त्याचप्रमाणे Galaxy Z Fold 6 आणी Galaxy Z Flip 6 हे याच इव्हेंटमध्ये लाँन्च होणार आहेत. यासोबत आपण Galaxy Watch 7 आणी wireless earbuds हे देखील लाँन्च होतील अशी अपेक्षा करू शकतो. खास आकर्षण असलेली Galaxy Ring हि ECG sensor सोबत येण्याची शक्यता आहे. सॅमसंग हेल्थ या अँप्लिकेशनच्या साहाय्याने ECG sensor मुळे शरीरात होणाऱ्या रक्त-प्रवाहातील त्रुटी किंवा समस्यांवर बारकाईने लक्ष ठेवता येते. तसेच यात स्लीप ट्रॅकिंग चे फिचर सुद्धा अपेक्षित आहे.

हि Galaxy Ring सोनेरी, चंदेरी आणी काळ्या कलर ऑपशन मध्ये मिळू शकते आणी नऊ वेगवेगळ्या आकारामध्ये मिळेल. मात्र याची किंमत सॅमसंग 300 USD किंवा त्याहून जास्त ठेऊ शकते. जवळपास भारतीय मूल्याप्रमाणे 25,000/- किंमत असलेल्या या Galaxy Ring ला ग्राहक पसंती देतील का याबाबत आपले मत कोंमेन्ट्स च्या माध्यमातून नोंदवा. Samsung Galaxy Unpacked इव्हेंट 2024 6 जुलैला होणार आहे. सॅमसंगचा हा कार्यक्रम पॅरिसमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. Samsung Galaxy Unpacked 2024 मध्ये अनेक फ्लॅगशिप उत्पादने लॉन्च होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सॅमसंगच्या यूट्यूब चॅनलवर होणार आहे. Galaxy Z Fold, Galaxy Z Flip मालिका, Galaxy Watch आणि नवीन Galaxy Buds Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये लॉन्च केले जातील. याशिवाय सॅमसंग आपली स्मार्ट रिंग Galaxy Ring देखील लॉन्च करू शकते.


HMD Global कडून तिन नवीन स्मार्टफोन लॉन्च

HMD Global ने 50 मेगापिक्सल कॅमेरा आणी 5000mah बॅटरी कॅपॅसिटी मध्ये असणारे नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. याला HMD Plus Series असे नाव देण्यात आले आहे. पूर्वी नोकिया या नावाने येणारे मोबाईल आता यापुढे HMD (Human Mobile Device) या नावाने येतील. यात HMD Pulse Pro, HMD Pulse plus, HMD Pulse हे तिन मॉडेल आहेत. हे सर्व स्मार्टफोन Android 14 या सॉफ्टवेअर सहित येतील.तसेच पुढील 2 वर्षासाठी अँड्रॉइड च्या अपडेट्स सुद्धा कंपनीकडून यामध्ये देण्यात येणार आहे.

तसेच कंपनीकडून या स्मार्टफोन ची घोषणा युरोपियन मार्केटसाठी करण्यात आली आहे. आणी याची किंमत 180 Euro च्या आसपास ठेवण्यात आली आहे.जवळपास 16 हजार रुपये भारतीय मुल्याप्रमाणे किंमत असेल. यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणी परपल हे तीन कलर्स आहेत. याचा डिस्प्ले 6.65 इंच HD+ LCD असून 600 नीटस पिक ब्राईटनेस आहे. तसेच स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट ला सपोर्ट करते. यामध्ये Unisoc T-606 प्रोसेसर दिला गेला आहे.

नोकिया फोन उत्पादक कंपनी एचएमडी ग्लोबलने आपला स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा केल्यापासून संपूर्ण टेक जग त्याची वाट पाहत आहे. कायदेशीर डावपेचांमुळे HMD स्मार्टफोन लाँच करण्यास विलंब झाला आहे, परंतु आज कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की पहिला HMD स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल.


Oneplus 13 चे Specification झालेत Leak

Oneplus 13 हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच याचे काही Specification Leak झाले आहेत. Tipster Digital चाट-स्टेशनच्या माध्यमातून Oneplus 13 ला येणारे काही exclusive फीचरची माहिती आता बाहेर आली आहे. Oneplus 13 हा भव्य असा 6.8 इंच डिस्प्ले, 2K रिसोल्युशन आणी Micro Curved Display LTPO या टेक्नॉलॉजी सहित येऊ शकतो. तसेच यात येणारी बॅटरी सुद्धा पूर्वीसारखीच दमदार असणार आहे. तसेच या स्मार्टफोनच्या डिझाईनमध्ये बरेच काही बदल करण्यात आलेत ते सुद्धा लवकरच येणाऱ्या काही आठवद्यामध्ये स्पष्ट होतील. तसेच प्रोसेसर च्या बाबतीत क्वालकॉम्मकडून लेटेस्ट चीपसेट घेतली जाणार आहे. लीक झालेल्या रिपोर्टवर विश्वास ठेवला तर OnePlus 13 स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच स्क्रीन असू शकते. फोन 1440 पिक्सेल 8T LTPO स्क्रीनसह येईल. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो.

OnePlus 13 स्मार्टफोन IP68 आणि IP69 रेटिंगसह येईल. फोन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरसह समर्थित असेल. हा फोन Android 15 आधारित OxygenOS 15 वर कार्य करेल. फोन 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज सपोर्टसह येईल. फोन खरेदी केल्यावर चार वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स दिले जातील. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 4 चिपसेट दिला जाईल. तसेच बॅक कॅमेरामध्ये Multi-focal सिस्टीमचा वापर करण्यात येईल. तसेच झुमिंगसाठी पेरिस्कॉप टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात येईल. Oneplus 12 पेक्षा बऱ्यचा सुधारणा Oneplus 13 मध्ये करण्यात येतील असा OnePlus Global चा प्रयत्न आहे.


JioCinema Premium : ₹1 प्रती दिवसापेक्षा कमी किंमतीमध्ये मनोरंजनासाठी उपलब्ध

JioCinema Premium त्यांच्या लेटेस्ट सबस्रीपशन पॅक मध्ये कमालीची ऑफर घेऊन आला आहे. JioCinema हि एक भारतातील प्रसिद्ध streaming Platform आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस युजर ची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. म्हणून खास जनतेची मागणी पूर्ण करण्यासाठी JioCinema Premium या सेवेमध्ये २९ रुपये प्रति महिना हा स्वस्त प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मनोरंजनच्या कार्यक्रमाचा आस्वाद ad-free घेता येणार आहे. तसेच हा आस्वाद 4K डिजिटल क्लालिटी मध्ये अनुभवता येणार आहे. NETFLIX, amazon आणी Disney Hotstar यासारख्या प्रतिस्पर्धी OTT प्लॅटफॉर्म ला दमदार टक्कर मिळणार आहे. आता इतर प्लॅटफॉर्म सुद्धा आपल्या सबस्रीपशन मध्ये दर कमी करतील? हे पाहण्यासारखे आहे.

कुठल्याही नविन टेक्नॉलॉजी विषया-संदर्भातील माहिती हवी असल्यास तो विषय कॉमेंट्सच्या माध्यमातून किंवा आमच्या इतर सोशल-मिडियाच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद..

Leave a Comment

Temp 2 TEMP 1