Tech-News 6 : Google AI Tool आता शिकवणार इंग्रजी, iPhone bug report Face ID झाला बंद ?

By Tek Marathi

Updated on:

नमस्कार वाचकांनो Gadget-Gappa च्या TECH News 6 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या टेक-न्यूज मध्ये Google AI Tool सर्च लॅब प्रोग्रॅम, Telegram ची नवीन अपडेट, Google chrome चे सिक्रेट फिचर, Iphone मध्ये सापडला नवीन बग आणी WhatsApp Channel युझर ना मिळणार नवीन अपडेट याबाबत माहिती घेणार आहोत. 

Google AI Tool : गुगलचे AI टूल शिकवेल आता इंग्लिश बोलायला.

Google AI Tool गुगलने स्पीकिंग प्रॅक्टिस AI टूल नवीन वैशिष्ट्य सहित सादर झाला आहे. या Google AI Tool च्या मदतीने तुम्ही इंग्लिश सोप्या पद्धतीत शिकु शकता. चला तर मग या टूलला कसे वापरायचे? याची माहिती घेऊया. टेक्नॉलॉजी श्रेत्रातील दिग्गज खेळाडू असलेले गुगल ग्राहकांसाठी नेहमीच नव्या संकल्पना घेऊन येण्यासाठी सज्ज असते. Google AI Tool या फीचर मुळे ज्या लोकांचे इंग्रची थोडेफार कच्चे आहे किंवा त्यांना इंग्रजी बोलताना काही समस्या येतात, अशा लोकांना हे Google AI Tool फार फायद्याचे ठरणार आहे.

Google AI Tool

या टूल मुळे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या इंग्लिश शिकू शकता. गुगल ने खास प्रकारचं AI अल्गोरिथम यासाठी तयार केलं आहे, त्यामुळे रियल टाईम मध्ये भाषेच्या मॉडेलचा वापर करणे खूप उपयुक्त ठरते. गुगलच्या मते इंग्लिश शिकणाऱ्यासाठी येणाऱ्या समस्या व त्याचे प्रश्न ते या Google AI Tool ला सहजरीत्या विचारू शकतात. ते त्याचे प्रश्न बोलून किंवा टाईप करून विचारू शकतात. त्यामुळे हे फीचर खूपच लाभदायक ठरणार आहे. Google AI Tool हे फीचर त्याच्या सर्च लॅब प्रोग्रॅम चा एक भाग आहे. त्यामुळे या ॲप चा फायदा फक्त अशा ग्राहकांना होईल, जे गुगल च्या सर्च लॅब प्रोग्रॅमशी जोडले गेले आहेत. त्यामुळे गुगल सर्च लॅबला लवकरात लवकर साइन अप करून याच्या फीचरचा फायदा घ्या.

सुरवातीला हे फक्त 6 देशामध्ये उपलब्ध आहे. त्यात भारत, अर्जेंटिना, व्हेनेझुएला, इंडोनेशिया, मेक्सिको आणी कोलंबिया या देशाचा समावेश आहे. ज्याचे इंग्रजी उच्चारण कच्चे आहे अशा लोकांना हे फीचर तर गुगल कडून वरदानच आहे. तसेच इंग्रजी बोलताना ग्रामर मध्ये सुद्धा सुधारणा कुठल्या कराव्यात याची माहिती देते. Google AI Tool हे एका इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षका सारखेच काम करते. त्यामुळे तुम्ही सुद्धा गुगल कडून येणाऱ्या या खास फीचरचा नक्की वापर करा.

Telegram Account – एकाचवेळी लॉन्च झाले खुप सारे फीचर.

WhatsApp सारखेच Telegram सुद्धा खूपच प्रसिद्ध ॲप आहे. याचे प्लेस्टोअरला 1 बिलियन पेक्षा पण जास्त डाऊनलोड आहेत. Telegram account एकाच वेळी बरेच फीचर सोबत घेऊन आला आहे. त्यात चॅनल आणी प्रोफाइल आपल्या इच्छेनुसार बदल करण्याची मुभा तुम्हाला मिळणार आहे. तसेच तुम्ही telegram account युजरचे स्टेटस त्यांना न समजता पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर चांगल्या रितीने ताबा ठेवता येतो. चला तर मग हे सर्व फीचर सविस्तर जाणून घेऊया.

Telegram Account
  • माय प्रोफाइल – माय प्रोफाइल या सेक्शन मध्ये युजर आपली प्रोफाइल जलदरित्या बदलू शकतो. तसेच तुमच्या 3 स्टोरीज ना तुम्ही प्रोफाइलला पिन करून ठेऊ शकता. तसेच इंस्टाग्राम सारखे हायलाइट्स सुद्धा तयार करू शकता.
  • चॅनल – Telegram च्या सर्च इंटरफेस मध्ये आता चॅनल टॅबचा पर्याय जोडण्यात आला आहे. आता कुठलेही चॅनल तुम्ही इथूनच सर्च आणी फॉलो करू शकता.
  • बर्थडे – telegram युजर आता आपला वाढदिवस प्रोफाइलमध्ये संलग्न करू शकता. जेव्हा तुमचा वाढदिवस असेल तेव्हा तुमच्या वाढदिवसाची तारीख ऍनिमेशन मध्ये सजवलेली दिसेल.
  • प्रोफाइल मध्ये चॅनल – जर तुमचे telegram वर चॅनल असेल. तर तुम्ही ते डायरेक्ट तुमच्या प्रोफाइलला लिंक करू शकता. आणी तुमच्या Bio मध्ये त्याची विस्ताराने माहिती लिहू शकता.
  • लोकेशन शेअरिंग – तसेच WhatsApp प्रमाणे तुम्ही तुमचे लोकेशन कुठल्याही दुसऱ्या युजर सोबत शेअर करू शकता. तसेच कायमस्वरूपी लोकेशन शेअरिंग चा पर्याय देखील यात उपलब्ध आहे.
  • फॉरवर्ड मेसेज मध्ये प्रोफाइल पिक्चर – आता या नवीन अपडेटनुसार फॉरवर्ड केलेल्या मेसेजमध्ये मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा फोटो दिसणार आहे.
  • ग्रुपवर नियंत्रण – Telegram ग्रुपचे ॲडमिन आता खूप सारे मेसेज एकावेळी सिलेक्ट करून डिलीट करू शकतात. तसेच इतर कुठलीही ॲक्शन घेऊन कुठली परवानगी देयाची हे गरजेनुसार ठरवू शकतात.
  • स्टोरीज – प्रीमियम युजर साठी Stealth Mode हे फीचर मिळते. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही युजरची स्टोरी त्यांना न समजता पाहू शकता. 
  • Delete telegram account – या पर्यायाद्वारे नको असलेले टेलिग्राम अकाउंट तुम्ही बंद करू शकता. 

Telegram account हे सर्व फीचर तुमचे Telegram ॲप update करून मिळवू शकता.

» हे सुध्दा वाचा :- Technews-5, Technews-4, Technews-3, Technews-2, Technews-1.

Google Chrome Logo : गुगल क्रोमचे 4 गुप्त फीचर

Google Chrome ला 2008 मध्ये गुगल कडून लॉन्च करण्यात आले होते. याआधी ब्राऊझर मध्ये फक्त मायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरर आणी मोझिला फायरफॉक्स हे दोनच पर्याय उपलब्ध होते. परंतु आता गुगल क्रोम ने खूप प्रगती केली असून सर्वांत जास्त लोकप्रिय ब्राऊझर च्या श्रेणीत Google Chrome ने उत्तम स्थान पटकावले आहे. त्यामुळे Google Chrome मध्ये येणार हे 4 गुप्त फीचर यांची आपण माहिती घेऊयात.

Google Chrome Logo
  • Google Chrome Tab – बऱ्याचदा Google Chrome मध्ये काम करताना बऱ्याचश्या टॅब आपण एकावेळी सुरू ठेवतो. आणी अचानक काही कारणामुळे त्या टॅब जर बंद झाल्या. तर सर्व महत्वाची कामे टांगणीला लागतात. अशावेळी अशांत न होता तुम्ही Google Chrome पुन्हा सुरू करून Ctrl + Shift + T हि तिन बटणे एकसाथ दाबल्यानंतर एक नवीन विंडो सुरू होऊन तुमच्या जुन्या कामाच्या विंडो परत पूर्ववत होतील.
  • Private Mode Searching – जर तुम्ही Google Chrome चा वापर काही माहिती सर्च करण्यासाठी करत असला. तर तुम्हाला त्या माहितीचा डेटा गुप्त ठेवायचा असल्यास क्रोम मध्ये येणारे इनकॉग्निटो मोड तुम्ही सुरू करू शकता. त्यामुळे तुम्ही सर्च करत असलेल्या माहिती विषयी कुठलाही डेटा गुगल क्रोम आपल्या हिस्टरी मध्ये स्टोअर करत नाही.
  • कीबोर्ड शॉर्टकट – जेव्हा तुम्ही Google क्रोम वर बऱ्यचा टॅब एकसाथ खोलून ठेवता. प्रत्येक टॅब मध्ये जाण्यासाठी माउसचा वापर करून सिलेक्ट करता. त्यामुळे तुमचा खूप वेळ वाया जातो. यामध्ये तुम्ही कीबोर्डच्या शॉर्टकट चा वापर करून तुमचे काम सोपे करू शकता. जर तुम्हाला पाहिल्या टॅब वरून पाचव्या टॅबवर जायचे असल्यास तुम्ही Ctrl+5 दाबून थेट पाचव्या टॅबला ओपन करू शकता.
  • Keyword Searching – जेव्हा तुम्ही क्रोमवर एकादा टॉपिक वर सर्च करत असता. तेव्हा तुम्हाला त्यामध्ये खुप हायपरलिंक दिसतात. तेव्हा तुम्ही त्या हायपरलिंक वर लेफ्ट क्लिक ने सिलेक्ट न करता. राईट क्लिक ने सिलेक्ट केले तर तुम्हाला ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्ही त्या हायपरलिंक च्या URL वर डायरेक्ट जाऊ शकता किंवा तोच keyword सर्च ऑप्शन सिलेक्ट करून कुठल्याही प्रकारच्या कॉपी पेस्ट न करता त्याबाबत माहिती शोधू शकता.

अशा Google Chrome च्या सेटिंग चा वापर करून तुम्ही तुमचे काम जलदरित्या करू शकता.

iphone bug report : iPhone चा Face ID झाला बंद.

iphone bug ॲपल च्या iOS मध्ये एक बग समोर आले आहे. त्याबाबत ॲपल कंपनीला सुद्धा माहिती नाही तसेच वापरकर्त्यांना होणाऱ्या समस्येचे कसे निराकरण करावे याची माहिती सुद्धा उपलब्ध नाही. सर्व-सामण्याप्रमाणे हॅकिंग या सारख्या गोष्टीमध्ये Face ID काम करायचे बंद करतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वप्रथम पासवर्ड बदलने. आणी आपल्या अकाउंट चे टु फॅक्टर आथेनटीफिकेशन  चालू करणे हे गरजेचे आहे. आयफोन वापरणाऱ्या काही ग्राहकाचे फोन हे अचानक स्वतःहून लॉक झाले. तर काहींचे Face ID काम करायचे बंद झालेत.

iphone bug report

iphone bug त्यामुळे त्रस्त ग्राहकांनी पासवर्ड रिसेट करून पासकोड चा पर्याय सुरू केला. तसेच या प्रक्रारासंबंधीची माहिती त्यांनी X, reddit व अन्य सोशल मिडियाच्या माध्यामातून पोस्ट करून दिली. तसेच अधिकृत ॲपलकडे तक्रार सुद्धा नोंदवली. नेमका हा काय प्रकार आहे याबाबत अद्याप ॲपलकडून कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही. सर्वप्रथम हा प्रकार 9 to 5 mac यांनी समोर आणला. तसेच काही टेक एक्स्पर्टच्या मते हा प्रकार केवळ अशा लोकांच्या बाबतीत घडला आहे, ज्यांनी ॲपलचा एकच आयाडी बऱ्याच डिव्हाइस मध्ये सुरू ठेवला आहे. तसेच काहींनी स्टोलेन डिव्हाइस प्रोटेक्शन हे फीचर सुरू ठेवले होते अशा युजरना सुद्धा ह्या समस्येला सामोरे जावे लागले.

WhatsApp Channel : Meta कडून नविन फीचर लॉन्च.

whatsapp channel update आपल्या चॅनल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास नवीन फीचर घेऊन आला आहे. पूर्वीपेक्षा आता WhatsApp वर चॅनल शोधणे सोपे होणार आहे. तसेच चॅनलचे नेवीगेशन सुधारित करण्यात आले आहे. आणी युजर इंटरफेस सुद्धा सुधारण्यात आला आहे. वेरिफाएड channel ना शोधणे आता सोपे झाले आहे. या नवीन अपडेटमुळे तुम्ही एकसाथ बऱ्याच चॅनेलला फॉलो किंवा अनफॉलो करू शकता. WhatsApp ने मागील वर्षी सप्टेंबर मध्ये Channel या फीचरची सुरवात केली होती.

whatsapp channel update

आज चॅनलच्या वापरकर्त्यांनी करोडच टप्पा पार केला आहे. तसेच WhatsApp channel update चे खूप फीचर्स टेस्टिंग मोड मध्ये आहेत. तसेच चॅनलचे मालक आणी युसर अशा दोन विभागात हे ऑप्शन आपल्याला WhatsApp देणार आहे. यात आलेल्या नवीन अपडेटमुळे फसव्या चॅनल ची ओळख लवकर पटवण्यात येणार आहे. या अपडेटमुळे iOS वापरकर्त्याचा युसर इंटरफेस पूर्वी ब्ल्यू कलर असलेला आता मात्र ग्रीन कलर मध्ये येणार आहे. सर्च बार पासून मेसेज इंडिकेटर सर्व पर्याय आता ग्रीन कलर मध्ये दिसणार आहेत.

आजच्या आपल्या मराठी भाषेतील Tech News बद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कॉमेंट्स च्या माध्यमातून पाठवा. तसेच कुठल्याही नवीन टेक्नॉलॉजी संदर्भातील विषयामध्ये माहिती हवी असल्यास तो विषय कॉमेंट्स च्या माध्यमातून किंवा आमच्या Facebook, Instagram, Twitter आणी इतर सोशल मिडियाला फोलो करून त्याच्या माध्यमातून कळवा.

जय महाराष्ट्र,
@Gadget_Gappa🚩

Leave a Comment

Temp 2 TEMP 1