Tech-News 7 : Realme 13 pro सिरीज झालीय लाँन्च.. Oneplus देणार मोफत स्क्रीन अपग्रेड ?

By Tek Marathi

Updated on:

नमस्कार मित्रांनो Gadget-Gappa च्या TECH NEWS 7 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 

Xiaomi Redmi Pad Pro 5g : किंमत 21,999/- पासून सुरु..

Xiaomi ने आज Redmi Pad Pro 5g भारतामध्ये 21,999/- मध्ये लाँन्च केला आहे. यात रेडमी ने WiFi आणी 5G असे दोन व्हेरिएंट लाँन्च केले आहेत. Redmi Pad Pro हा मिस्ट ब्लू, ग्रॅफाइट ग्रे, क्विक सिल्वर या तीन कलर ऑपशन मध्ये उपलब्ध आहे. यात Snapdragon 7S GEN 2 हा 2.4GHz कार्यक्षमतेवर 4 नॅनोमीटर या टेक्नोलॉजी वर काम करणार आहे. तसेच स्टोरेज आणि रॅम साठी दोन पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. यात एक 6GB+128GB आणी दुसरा 8GB+256GB असा पर्याय उपलब्ध आहे.

Xiaomi-Redmi-Pad-Pro-5g

मात्र स्टोरेज UFS 2.2 असून रॅम LPDDR4X या टेक्नोलॉजी वर कार्यरत आहे. यातील डिस्प्ले 12.1″ असून 2560 x 1600 (2.5K) असे रिसोल्युशन आहे. डिस्प्लेला 16:10 अस्पेक्ट रेशो असून 120Hz रिफ्रेश रेट हा 30/48/50/60/90/120Hz असा अँडपाटिव्हरित्या काम करतो. डिस्प्ले ला 500 nits ब्राइटनेस असून पीक-ब्राइटनेस 600 nits पर्यंत जाऊ शकते. Redmi Pad Pro मध्ये 10000 mAh कॅपॅसिटीची बॅटरी असून 33W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो. यासोबतच Android 14 हि ऑपरेटिंग सिस्टिम असून Xiaomi HyperOS वर कार्यरत आहे. Xiaomi Redmi Pad Pro 5g या टॅबलेट बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Xiaomi इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट – Xiaomi 

Nothing Phone 2a Plus : MediaTek Dimensity 7350 (5g) प्रो चिपसेट सोबत..

Nothing Phone 2a Plus हा सुद्धा आज भारतामध्ये लाँन्च झाला असून याची किंमत 27,999/- हि 8GB+256GB या व्हेरिएंटसाठी आहे.तर 29,999/- अशी 12GB+256GB या व्हेरिएंटसाठी आहे. ह्या स्मार्टफोन मध्ये Android 14 हि ऑपरेटिंग सिस्टिम असून Nothing OS 2.6 वर कार्यरत आहे. यात खास असे कि, पुढील 3 वर्ष आपल्याला अँडॉईड अपडेट आणी 4 वर्ष सिक्युरिटी अपडेट मिळणार आहेत. Nothing Phone 2a Plus हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7350 (5g) या प्रोसेसर सोबत 3.0GHz कार्यक्षमतेवर 4 नॅनोमीटर या टेक्नोलॉजी वर काम करणार आहे. तर ARM Mali-G610 MC4 हा ग्राफिक प्रोसेसर देण्यात आला आहे.

Nothing Phone 2a Plus

हा स्मार्टफोन आपल्याला ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमरा, ५० मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणी ५० मेगापिक्सेल सेल्फी अश्या कॅमेरा सेटअप सोबत पाहायला मिळणार आहे. Nothing Phone 2a Plus चा डिस्प्ले 6.7” AMOLED आणी 120 Hz रिफ्रेश रेट असून Corning® Gorilla® Glass 5 याचे प्रोटेक्शन सुद्धा मिळणार आहे. यात 5,000 mAh कॅपॅसिटीची बॅटरी असून 50W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. Nothing Phone 2a Plus या स्मार्टफोन बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Nothing Phone इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत वेबसाईट – Nothing Phone

» हे सुध्दा वाचा :- Technews-6, Technews-5, Technews-4, Technews-3, Technews-2, Technews-1.

Redmi 13c 4g : बनला जागतिक पातळीवर टॉप १० विक्रीतील स्मार्टफोन 

जगामध्ये सर्वात जास्त टॉप टेन स्मार्टफोन विक्रीमध्ये नेहमीच अँपल आणी सॅमसंग या कंपनीचे स्मार्टफोन अव्व्वल स्थान पटकवताना दिसतात. यात २०२३ मध्ये Iphone 14 हा प्रथम स्थानावर असून 2024 मध्ये Iphone 15 हा प्रथम स्थानावर आहे. तसेच इतर कुठलीही स्मार्टफोन बनवणारी कंपनी या टॉप टेन क्रमवारीत  कधीच दाखल झाली नाही. प्रथमच 2024 मध्ये Redmi 13 c 4g हा आठव्या स्थानावर येऊन जागतिक पातळीवर टॉप १० विक्रीतील स्मार्टफोन या यादीत नाव मिळवले आहे. Redmi 13 c 4g हा बजेट सिरिज मधला स्मार्टफोन असून MediaTek Helio G85 या प्रोसेसर सोबत येतो . यात 6.74″ डिस्प्ले असून रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच 18W PD चार्जिंग सोबत 5000mAh ची बॅटरी आहे.  

Redmi 13 c 4g

Oneplus free screen upgrade – मोफत मिळणार नवीन स्क्रीन जुन्या स्मार्टफोन ला सुद्धा.. 

Oneplus च्या वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. Oneplus देणार आहे मोफत स्क्रीन अपग्रेड त्यांच्या जुन्या स्मार्टफोनसाठी कारण Oneplus मध्ये येणाया ग्रीन लाईन समस्येमुळे ग्राहक हैराण झाले होते. आता हि समस्या पुन्हा येऊ नये यासाठी Oneplus ने ग्राहकांना मोफत LIFETIME स्क्रीन अपग्रेड सुविधा दिली आहे. ह्यात Oneplus 8pro, Oneplus 8T, Oneplus 9, Oneplus 9R या स्मार्टफोन चा समावेश होतो. हि सुविधा आपल्याला Oneplus च्या अधिकृत सर्विस सेंटर मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबत स्मार्टफोनला इतर क्लीनिंग आणि मेंटेनन्स सर्विस सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सुविधेचा फायदा घ्या आणी भविष्यात ग्रीन लाईन समस्येचा धोका टाळा. 

Oneplus-free-screen-upgrade

Realme 13 pro सिरीज झालीय लाँन्च : Realme 13 pro आणी Realme 13 pro+

Realme 13 pro आणी Realme 13 pro plus असे दोन स्मार्टफोन रिअलमी इंडिया ने आज लाँन्च केले आहेत. Realme 13 pro हा 26,999/- तर Realme 13 pro plus हा 32,999/- किंमतीपासून सुरु होतो. कॅमेरा या स्मार्टफोनचे मुख्य आकर्षण आहे. Realme 13 pro मध्ये 50MP Sony LYT-600 OIS हा सेन्सर मिळतो. पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी हा उत्कृष्ट असा कॅमेरा सेन्सर आहे.

Realme 13 pro plus मध्ये प्रायमरी कॅमेरा 50MP Sony LYT-701 OIS हा सेन्सर असून 50MP Sony LYT-600 हा पेरिस्कोप सेन्सर मिळतो. त्यामुळे 3x ऑप्टिकल झूम आणि 12x सुपर झूम हि खास वैशिष्ट्य मिळतात. यासोबतच Android 14 हि ऑपरेटिंग सिस्टिम असून Realme UI 5.0 वर कार्यरत आहे. Realme 13 pro आणी Realme 13 pro plus या स्मार्टफोन बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी रिअलमी इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट – Realme 

Leave a Comment

Temp 2 TEMP 1